WCL Coal truck overturns, driver killed  
नागपूर

कोळसा ट्रक उलटून चालकाचा मृत्यू, आता वेकोलि प्रशासनावर होताहेत हे आरोप...

सतीश घारड

टेकाडी (जि. नागपूर) : पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव खुली कोळसा खाण येथून कोळसा भरलेला ट्रक डुमरी सायडिंगमध्ये रिकामा करण्यास गेलेल्या ट्रक चालकाचा त्याच ट्रकखाली दबून मृत्यू झाला. ही घटना रविवारच्या रात्री घडली. याप्रकरणी गोंडेगाव वेकोली प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. श्रावण देवीदास गेडाम (वय ४०, कावळापेठ उमरेड) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे.

रविवारrएकीकडे पुराच्या पाण्याने थैमान मांडले होते. पुराच्या पाण्याने गोंडेगाव कोळसा खाणीअंतर्गत येणाऱ्या डुमरी सायडिंगमध्ये एका ट्रक चालकास आपले प्राण गमवावे लागले. मृत ट्रक चालक श्रावण देवीदास गेडाम रात्रीला नऊच्या सुमारास गोंडेगाववरून कोळसा भरलेला ट्रक घेऊन डुमरी येथे ट्रक रिकामा करण्यास आलेला होता. परंतु, डुमरी सायडिंग येथील रस्ते चिखलाने माखलेले असून मोठमोठे खड्डे असल्याने ट्रक पलटी झाला आणि त्याच ट्रकखाली दबून चालकाचा मृत्यू झाला.

वेकोली प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यांच्या जीवाच्य सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली जात नाही, असा आरोप करीत सदर अपघाताला वेकोलि प्रशासनाला धारेवर धरत राष्ट्रीय कोळसा खदान मजदूर संघ नागपूर क्षेत्राचे अध्यक्ष नरेश बर्वे आणि उदयसिंग यादव नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण क्षेत्र महासचिव यांनी डुमरी सायडिंग येथे होणारी कोळसा वाहतूक बंद पाळून वेकोलि प्रशासनाला धारेवर धरले होते.

मृतकाच्या कुटुंबाला नियमानुसार पंधरा लाख आणि एकास वेकोलिमध्ये नोकरी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वेकोलिने तत्काळ डुमरी सायडिंग येथील रस्ते दुरुस्त करून ट्रक चालकांना योग्य वागणूक द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नरेश बर्वे यांनी दिला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचा पट्टा सक्रीय, राज्यात 'या' भागात मुसळधार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मी २ महिन्यांची गर्भवती, निदा खानची अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव; तर पोलिसांची ५ पथकं अजूनही घेतायत शोध

Akshaya Tritiya gold rate : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं महाग, चांदीही वधारली; वाचा आजचा नवा भाव

'गजवा ए हिंद'च्या नावावर धर्मांतराचा प्रयत्न, दारू अन् सिगारेट पिण्यासाठी बळजबरी, लव्ह बाइट म्हणत तरुणीच्या शरीरावर केल्या जखमा

Akshaya Tritiya Wishes in Marathi: लक्ष्मी कृपा, सुखाचा वर्षाव...साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेच्या कुटुंब अन् मित्रपरिवाराला द्या मराठीतून खास शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT